‘विवेक अग्निहोत्री’ यांना धमक्या, दोघांनी कार्यालयात…

‘विवेक अग्निहोत्री’ यांना धमक्या, दोघांनी कार्यालयात…

Published by :
Team Lokshahi
Published on

'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) च्या यशानंतर आता दिग्दर्शक (Director) विवेक अग्निहोत्रीला (Vivek Agnihotri) जीवाची भीती वाटत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्रीने खुलासा केला की, आता त्याला आपल्या जीवाला धोका आहे. तो मानतो की हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता अनेक लोक त्याच्या विरोधात उभे राहीले आहेत.
दिग्दर्शक दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर (Box office) कमाल दाखवत आहे. पण चित्रपटाच्या यशानंतर विवेक अग्निहोत्रीला जीवाला धोका निर्माण झाला आहे. नुकतेच दोन जण जबरदस्तीने त्यांच्या कार्यालयात घुसले आणि धक्काबुक्की केली.
बॉलीवुड हंगामा (Bollywood humgama) मध्ये दिलेल्या एका इंटरव्यू (Interview) मध्ये विवेक अग्निहोत्रीने सांगितले : धमक्या मिळत आहेत, अलीकडेच दोन मुलांनी आमच्या ऑफिसमध्ये (office) घुसखोरी केली. मी आणि माझी पत्नी ऑफिसमध्ये नसताना हा प्रकार घडला. ऑफिसमध्ये फक्त एक मैनेजर होती जी वयस्कर आहे. त्या मुलांनी त्यांना दरवाजाकडे ढकलले आणि ती पडली. यानंतर त्यांना माझ्याबद्दल विचारले आणि ते पळून गेले. या घटनेबाबत मी कोणालाही सांगितले नाही कारण अशा लोकांना कोणत्याही प्रकारची प्रसिध्दी मिळावी असे मला वाटत नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com