विकी कौशल-तृप्ती दिमरीच्या 'बॅड न्यूज'ने पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई; जाणून घ्या...
आनंद तिवारी दिग्दर्शीत 'बॅड न्यूज' हा चित्रपट 19 जुलैला रिलीज झाला. हा चित्रपट 1800-2000 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे, तरी 'बॅड न्यूज'ला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. तृप्ती दिमरीचा 'अॅनिमल' या चित्रपटानंतर 'बॅड न्यूज' हा आगामी चित्रपट आहे. अॅनिमल चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पण 'बॅड न्यूज' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून तितका असा चांगला प्रतिसाद मिळाला नाही आहे. 'बॅड न्यूज' या चित्रपटाच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्यांमधून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कितीची कमाई करेल याची सगळ्यांच उत्सुकता लागून होती. पण 'बॅड न्यूज' या आगामी चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 8.50 कोटींची कमाई केली आहे.
चित्रपटाची चांगली सुरुवात होण्यात एक मुख्य कारण म्हणजे 'तौबा तौबा' हे गाणं, विकी कौशल आणि तृप्ती दिमरीचं हे गाणं प्रचंड हिट झालं आहे. सोशल मीडियावर या गाण्याचा एक वेगळाच फॅनबेस तयार झाला आहे. या चित्रपटात विकी कौशल आणि तृप्ती दिमरी या दोघांशिवाय अम्मी विर्क हा देखील प्रमुख भूमिकेत दिसत आहे. याचसोबत नेहा धुपिया सहाय्यक भूमिका साकारताना दिसत आहे. 'बॅड न्यूज' हा चित्रपट कॉमेडी असून या चित्रपटात तृप्ती दिमरी गरोदर असून ती 'हेट्रोपॅटर्नल सुपरफिकंडेशन' या प्रकरारच्या गरोदरपणातून जाताना दाखवली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी फारशी चांगली कमाई नाही केली तरी आता 'बॅड न्यूज' पूढील काही दिवसात कशी कमाई करेल या कडे सर्वांचं लक्ष लागले आहे.