Seema Deo: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

Seema Deo: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन.अभिनेत्री सीमा देव यांना २०२० पासून दीर्घ आजाराने ग्रासलं होतं. आज सकाळी त्यांचं निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं. सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री होत्या. आनंद या सिनेमात त्यांनी राजेश खन्नासह केलेली भूमिका आजही लोकांच्या आठवणीत आहे.

‘सरस्वतीचंद्र‘आनंद’ आणि ‘ड्रीम गर्ल’ या हिंदी चित्रपटांमध्येही सीमा देव यांनी काम केले आहे. त्याच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला अशा अनेक सिनेमांत त्यांनी काम केलं. १९५७ साली ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी पदार्पण केले. 

गेल्या काही काळापासून सीम त्यांचा मुलगा अभिनव देव यांच्यासोबत मुंबईतील वांद्रे याठिकाणी राहत होत्या. १९६३ सालच्या ‘पाहू रे किती वाट’ या चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र सरकारचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार सीमा देव यांना मिळाला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com