Jayant Savarkar : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

Jayant Savarkar : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. काही वेळापूर्वी ठाण्यातील एक खासगी रुग्णालयात त्यांचं निधन झालं. काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी 11.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. 100 हून अधिक मराठी चित्रपट, नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. मराठीसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये देखिल काम केलं होते.

जयंत सावरकर यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले होते. ३० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. सध्या तरी त्यांचे पार्थिव ठाणे येथील रुग्णालयात ठेवलं असून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार बाबत माहिती नंतर देण्यात येईल अशी माहिती त्यांचे पुत्र कौस्तुभ सावरकर यांनी दिलीय.

सावरकर यांच्या निधनाच्या बातमीनं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील विविध कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. 'अलीबाबा चाळीस चोर', 'अल्लादीन जादूचा दिवा', 'आम्ही जगतो बेफाम', 'एकच प्याला' अशी अनेक नाटके त्यांची गाजली आहेत. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com