“महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातंय…”अक्षय कुमारच्या लूकवर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

“महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातंय…”अक्षय कुमारच्या लूकवर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा काळातील अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा काळातील अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटानंतर अजून एक दिग्दर्शक महेश मांजेरकर यांचा आगामी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमार याने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

‘वेडात मराठी वीर दौडले सात’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा पराग कुलकर्णी यांची असून पटकथा महेश मांजरेकर, पराग कुलकर्णी यांची आहे. तर संवाद संजय पवार यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे, प्रतापराव गुजर, महेश मांजरेकरांचा मुलगा सत्य मांजरेकर, बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, विशाल निकम आणि अभिनेता हार्दिक जोशी दिसणार आहे.

“महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातंय…”अक्षय कुमारच्या लूकवर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये अक्षय कुमार झाला ट्रोल, लोक म्हणाले- भाऊ, चांगला अभिनय कर

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मिडियावर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे की, “जर्मनी,पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय… ‘वेडात मराठे वीर दौडले सात’. त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला “वेड्यात” काढलं जातयं असं वाटतं”, असे आव्हाड म्हणाले आहेत.

“महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातंय…”अक्षय कुमारच्या लूकवर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
'वेडात मराठे वीर दौडले सात' या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरुवात; अक्षय कुमारने केलं पोस्ट
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com