Varun Dhawan : वरुण धवन होणार बाबा; खास फोटो केला शेयर

Varun Dhawan : वरुण धवन होणार बाबा; खास फोटो केला शेयर

अभिनेता वरुण धवन बाबा होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अभिनेता वरुण धवन बाबा होणार आहे. वरुन धवनने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यानं पत्नी नताशा सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे.

अनेक बाॅलिवूड कलाकारांनी वरुण धवन याच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. तसेच शुभेच्छांचा वर्षाव देखील केले आहेत. वरुण धवन आणि नताशा यांचे लग्न 2021 मध्ये झाले. वरुण धवन आणि नताशा हे आता लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत.

वरुण धवन याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. वरुण धवन हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय दिसतो. तो त्याच्या चाहत्यांसाठी फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com