खरं स्वातंत्र्य २०१४ पासूनच, मत बदलणार नाही – विक्रम गोखले

खरं स्वातंत्र्य २०१४ पासूनच, मत बदलणार नाही – विक्रम गोखले

Published by :
Published on

देशाच्या स्वातंत्र्याबद्दल कंगना राणावत (Kangana Ranaut) हिनं केलेल्या वक्तव्याचं समर्थन केल्यामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकलेले अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी आज आपली बाजू मांडली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते '२०१४ पासून देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं प्रामाणिक मत आहे. मी त्यावर ठाम असून ते बदलणार नाही. मी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केलेला नाही. मूळ भाषणात मी काय म्हणालो ते दाखवण्यात आलेलं नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला,' असं गोखले यांनी आज स्पष्ट केलं.

'कंगनाची दोन वर्षांतली मतं तिची वैयक्तिक आहेत. स्वातंत्र्याबद्दल तिनं व्यक्त केलेल्या मताला तिची वैयक्तिक कारणं आहेत. तिचं समर्थन करताना माझी कारणं वैयक्तिक आहेत. मी तिला ओळखतही नाही. मी केवळ तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला. तो माझ्या अभ्यासाच्या आधारे दिला. १८ मे २०१४ च्या 'गार्डियन'मध्ये जे लिहिलं गेलंय, तेच कंगना बोलली होती. ती काही चुकीचं म्हणाली नाही एवढंच मी म्हणालो. मी त्या मतावर आजही ठाम आहे. २०१४ पासून जागतिक पटलावर सक्षम उभं राहायला सुरुवात झाली, असं गोखले म्हणाले. मी तोंडफाटका माणूस आहे. मला ओठ शिवता येत नाहीत. त्यामुळंच माझी कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नाही. गेल्या ३० वर्षांत मला अनेक राजकीय पक्षांचे निरोप आले, पण मी गेलो नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com