94 वा ‘ऑस्कर पुरस्कार’सोहळा कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या..
सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 'ऑस्कर पुरस्कार' सोहळ्याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 27 मार्च रोजी लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 94 वा 'ऑस्कर पुरस्कार'सोहळा पार पडणार आहे.
ऑस्कर हा जगभरात अत्यंत मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. सिनेजगतातील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 'द पॉवर ऑफ डॉग' या सिनेमाला सर्वाधिक नामांकन मिळाले आहेत. तर भारताच्या 'राइटिंग विथ फायर' या सिनेमाने सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या श्रेणीत स्थान मिळवले आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 94 वा 'ऑस्कर पुरस्कार'सोहळा होणार आहे. तर 28 मार्चला भारतात या पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
अनेक सिनेरसिक ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा पुरस्कार सोहळा भारतीय सिनेसरिकांना 28 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता स्टार वर्ल्ड आणि स्टार मुव्हीजवर पाहता येणार आहे.