सांस्कृतिक मंत्री अमित देशमुखांच्या भूमिकेकडे रंगकर्मींच लक्ष्य….
दादर येथे सोमवारी शेकडो रंगकर्मीनी एकत्र येऊन राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली होती. तसेच राज्यभरातील रंगकर्मीनी आपआपल्या जिल्ह्य़ाच्या ठिकाणी आंदोलन केले होते.त्याची दखल घेऊन सांस्कृतिक मंत्र्यांनी रंगकर्मीना भेटण्याचे आश्वासन दिले. ही बैठक बैठक सुरू झाली असून सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या निर्णयाकडे आता राज्यातल्या कलाकारांच लक्ष आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या रंगकर्मी आणि रंगमंचावरील कामगारांच्या वेदना सरकारला कळण्यासाठी 'रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र' यांच्या वतीने क्रांतीदिनानिमित्त महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामध्ये विजय पाटकर, मेघा घाडगे, मिलिंद दस्ताने, विनय गिरकर, संदेश उमप, उमेश ठाकूर यांच्यासह अनेक कलाकार, बॅकस्टेज कलाकार, मिमिक्री आर्टिस्ट, ऑर्केस्ट्रा कर्मचारी सहभागी होते.यामध्ये नाटय़कर्मी, वादक, नर्तक, लोककलावंत, लावणी कलाकार उपस्थित होते. यावेळी 'जागर रंगकर्मीचा' हा कार्यक्रम सादर करून कलाकारांनी आपल्या मागण्या मांडल्या.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिकमंत्री यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नाही तसेच मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत भोईवाडा पोलीस ठाण्याबाहेरच 'ठिय्या आंदोलन' करण्याची आक्रमक भूमिका सर्व रंगकर्मीनी घेतली होती.