KK Birthday: केकेची 'ही' गाणी जी कायम आपल्या आठवणीत राहतील
केके म्हणजेच कृष्ण कुमार कुन्नथ यांना हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कोणी ओळखत नाही असे नाही. केकेचा आवाज, त्याची गाणी संपूर्ण देशात लोकप्रिय होती. केकेने हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती या चित्रपटांमधील गाणी गायिली आहेत. त्याच्या आवाजाने जणूकाही जादूच केली होती. आज केके आपल्यामध्ये नसला तरी त्याचा आवाज संपूर्ण देशात ऐकला जातो. उद्या केकेचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...
23 ऑगस्ट 1968 साली दिल्लीत केकेचा जन्म झाला. त्याने माउंट मेरी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर दिल्ली यूनिवर्सिटीतून ग्रॅज्यूएशन पूर्ण केले. चित्रपटांमधील गाणी गाण्यापूर्वी केके एक सेल्समॅन म्हणून काम करत होता. 1999 साली क्रिकेट वर्ल्ड कपच्या वेळी भारतीय टीमला पाठिंबा देण्यासाठी त्याने 'जोश ऑफ इंडिया' हे गाणे गायिले होते. त्यानंतर त्याने 'पल' हे गाणे गायिले.
चित्रपटांमध्ये गाणे गाणाऱ्या केकेने कोणतेही गायनाचे प्रशिक्षण घेतले नव्हते. तो नेहमी किशोर कुमार आणि आर.डी. बर्मनचा चाहता होता. केकेने सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातील गाणे गायिले होते. या गाण्याने केकेने आयुष्य बदलले. 2000 साली या गाण्यासाठी केकेला फिल्म फेअर पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर त्याने, मोहब्बत, शाका लाका बूम बूम, हिप-हिप हुर्रे आणि काव्यांजली या मालिकांचे टायटल साँग गायिले. या गाण्यांमुळे केके घराघरात पोहोचला.
३१ मे २०२२ साली कोलकातामधील एका इवेंटमध्ये परफॉर्म करत असताना अचानक केकेची प्रकृती खालवली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी केकेचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती दिली. आज केके आपल्यामध्ये नसला तरी त्याची गाणी आजही हिट आहेत.
या वाढदिवशी आपण त्याची काही प्रसिद्ध अशी गाणी ऐकून त्याचा वाढदिवस नक्कीच साजरा करु शकतो. चला तर मग पाहूयात, केकेची प्रसिद्ध गाणी....
1. आंखों में तेरी
2. तू ही मेरी शब है
3. तडप तडप
4. कोई कहे कहता रहे
5. अब तो फॉरेव्हर
6. सच कह रहा है दिवाना
7. मैने दिल से कहा
8. यारों