ह्या चार चित्रपटांनी तीन दिवसात 400 कोटी कमावले! सिनेसृष्टीची रेकॉर्डब्रेक कामगिरी
गेले 3 दिवस भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा वीकेंड ठरला. 100 वर्षांच्या इतिहासात असे प्रथमच घडले, जेव्हा 3 दिवसांत 4 चित्रपट प्रदर्शित झाले आणि चारही चित्रपटांनी बंपर कमाई केली. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते, चित्रपटांचे एकूण कलेक्शन सुमारे 400 कोटी इतके आहे. यामध्ये रजनीकांतचा जेलर, सनी देओलचा गदर 2, अक्षय कुमारचा OMG 2 आणि चिरंजीवीचा भोलाशंकर या चित्रपटांचा समावेश आहे.
‘गदर 2’ ने पहिल्या तीन दिवसांत 135 कोटींहून अधिक कमाई केली. 'ओमएमजी 2' ने 43 कोटी, 'जेलर'ने 146 कोटी रुपये आणि ‘भोला शंकर’ने 26 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. 13 ऑगस्ट रोजी आतापर्यंतची एका दिवसांतील सगळ्यात जास्त प्रेक्षकांची नोंद झाल्याचा पीव्हीआर आयनॉक्सचा दावा आहे. या एका दिवशी पीव्हीआर आयनॉक्सच्या देशभरातील सर्व सिनेमागृहात मिळून जवळपास 13 लाख प्रेक्षकांची नोंद झाली आहे.