Mahatma Gandhi Jayanti 2023: या अभिनेत्यांनी पडद्यावर साकारली महात्मा गांधी यांची भूमिका
बॉलिवूडच नव्हे तर हॉलीवूडलाही पडली होती महात्मा गांधीजींची भुरळ! पडद्यावर गांधीजी साकारून 'या' हॉलिवूड अभिनेत्याने मिळवला ऑस्कर!
02 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 154 वी जयंती आहे, ज्यांनी लोकांना अहिंसेचा मंत्र शिकविला. गांधींचे आदर्श आणि विचार कोणी विसरले नाहीत. गांधीजींच्या विचारांवर केवळ पुस्तकेच लिहिली गेली नाहीत तर बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपट बनले आहेत.
या चित्रपटांमध्ये महात्मा गांधींची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनीही लोकांची मने जिंकली आहेत. आज गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्या कलाकारांचा आढावा घेऊ, ज्यांनी विविध चित्रपटांतून गांधीजी साकारले आहेत...
1. जे. एस. कश्यप (नाईट अवर टू रामा) :
महात्मा गांधींची व्यक्तिरेखा जे. एस. कश्यप यांनी प्रथम पडद्यावर केली. 1963 च्या 'नाईट अवर टू रामा' या चित्रपटाची कथा त्याच नावाच्या स्टॅन्ली वॉल्पर्ट यांनी लिहिलेल्या कादंबरीवर आधारित काल्पनिक चित्रपट आहे. महात्मा गांधी यांची हत्या करणारा नाथूराम गोडसेदेखील या चित्रपटाच्या मध्यभागी आहे. या चित्रपटात जे. एस. कश्यप वगळता इतर सर्व कलाकार हॉलिवूडचे होते.
2. दिलीप प्रभावळकर (लगे रहो मुन्नाभाई) :
‘गांधीगिरी' या संकल्पनेचे श्रेय फक्त संजय दत्त आणि अरशद वारसी यांनाच नाही तर मराठी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनाही आहे. 'लगे रहो मुन्नाभाई' ( lage raho munna bhai) चित्रपटात त्यांनी एका वेगळ्याच शैलीत बापू बनून गांधीजींचे विचार समजावून सांगितले, ते खरोखर कौतुकास्पद आहेत.
3. बेन किंग्स्ले (गांधी) :
बेन किंग्सले हा इंग्रज आहे ज्याने बापूंची भूमिका बजावून भारतीयांची मने जिंकली. 1982 मध्ये आलेल्या 'गांधी' चित्रपटात मोहनदास करमचंद गांधी यांची भूमिका साकारण्यासाठी बेन किंग्सले (ben kingsley as mahatma Gandhi ) यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर जिंकला होता.
4. दर्शन जरीवाला (गांधीः माय फादर) :
फिरोज अब्बास खान यांच्या 'गांधीः माय फादर' या चित्रपटात दर्शन जरीवाला बापूंची भूमिका साकारली होती. हा चित्रपट गांधी आणि त्यांचा मुलगा हरीलाल गांधी यांच्या नात्यावर आधारित होता. साहजिकच, बाप- मुलाचे द्वंद्व एक सेलिब्रिटी म्हणून साकारणे अभिनेता जरीवाला यांच्यासाठी आव्हानात्मक होते. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे समीक्षकांकडून खूप कौतुक झाले.
5. रजत कपूर (द मेकिंग ऑफ महात्मा) :
डिटेक्टिव ब्योमकेश बक्षी म्हणून ओळखले जाणारे रजत कपूर यांचेही 'द मेकिंग ऑफ महात्मा' या चित्रपटात मुख्य भूमिका केल्याबद्दल त्यांचे कौतुक झाले. 1996 साली आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केले होते.
6. नसीरुद्दीन शाह (हे राम) :
महात्मा गांधींबाबत वेगळा दृष्टिकोन देणारा 'हे राम' चित्रपट वादग्रस्त ठरला असताना गुजराती उच्चारण आणि महात्मा गांधींची देहबोली आत्मसात करून शाह (nasruddin shah as mahatma Gandhi ) यांनी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला यथोचित न्याय दिला. या भूमिकेचे खूप झाले.
7. अन्नू कपूर (सरदार) :
विजय तेंडुलकर लिखित आणि केतन मेहता दिग्दर्शित 'सरदार' या 1993 साली आलेल्या चित्रपटात अन्नू कपूर ( Annu Kapoor as mahatma Gandhi ) महात्मा गांधीच्या भूमिकेत दिसले. परेश रावल यांनी साकारलेल्या सरदार वल्लभभाई पटेलांवर हा चित्रपट आधारित आहे. महात्मा गांधींच्या धोरणांबद्दल आणि त्यांच्याबद्दल सरदार कशी खिल्ली उडवीत याबद्दल या चित्रपटात सांगितले आहे. तथापि, नंतर त्यांना गांधीजींसोबतच जावे लागले, असा या चित्रपटाचा सार आहे.
8. मोहन गोखले (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) :
2000 साली आलेल्या जब्बार पटेल दिग्दर्शित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या चित्रपटामध्ये महात्मा गांधींच्या व्यक्तिरेखेचे नकारात्मक चित्रण करण्यात आले होते. गांधीजींचे सिद्धांत व धोरणे त्यांनी देशासाठी बनवलेल्या घटनेविरूद्ध कसे होते, हे सांगण्याचा हा चित्रपट प्रयत्न करतो. लोक महात्मासमवेत होते, त्यामुळे देशाच्या घटनेत काही अप्रिय बदल करावे लागले. या चित्रपटात बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता मम्मूट्टी यांनी केली होती. आणि मोहन गोखले महात्मा गांधी झाले होते ( Mohan Gokhale as mahatma Gandhi )
9. नीरज काबी (संविधान - द मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया) :
आंतरराष्ट्रीय चित्रपट, हिंदी सिनेमा आणि रंगमंच अभिनेता नीरज काबी ( Neeraj kabi as mahatma Gandhi ) याने संपूर्ण कारकीर्दीत पडद्यावर महात्मा गांधींची चक्क दोनदा भूमिका केली. 2014 साली टीव्हीच्या ‘संविधान – द मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया' या मिनी मालिकेसाठी महात्मा गांधी बनले. 10 भागांमध्ये बनविलेली ही मालिका संविधान निर्मितीची प्रक्रिया दर्शविण्यासाठी तयार केली गेली आहे. यात भीमराव आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सचिन खेडेकर यांनी केली आहे. त्याच वेळी नीरज काबी ब्रिटीश भारतीय ड्रामा चित्रपट 'व्हायसरायज हाऊस' मध्ये दुसऱ्यांदा महात्मा गांधी बनले. हा चित्रपट 'पार्टीशन - 1947' या नावाने देशात प्रदर्शित झाला.
10. सुरेंद्र राजन :
फार कमी लोकांना माहित आहे की अभिनेता सुरेंद्र राजन ( Surendra Rajan as mahatma Gandhi ) यांनी सगळ्यात जास्त वेळा पडद्यावर महात्मा गांधीची भूमिका साकारली आहे. यात शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी आणि चित्रपटांचाही समावेश आहे.