इस्रायलच्या राष्ट्रगीतामुळे अनु मलिक झाले ट्रोल

इस्रायलच्या राष्ट्रगीतामुळे अनु मलिक झाले ट्रोल

Published by :
Published on

'इंडियन आयडल १२'चे परिक्षक अनु मलिक यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. अनु मलिक यांना इस्रायलचा जिमनास्ट डोल्गोपयात यांना ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळाल्यानंतर ट्रोल करण्यात आले आहे. खरतरं ऑलिम्पिकमध्ये जो खेळाडू सुवर्ण पदक जिंकतो त्याच्या देशाचं राष्ट्रगीत लावले जाते, आणि डोल्गोपयात यांचा जिमनॅस्ट खेळात सुवर्ण पदक मिळाल्यानंतर इस्रायलचे राष्ट्रगीत लावण्यात आले आणि नंतर अनु मलिक ट्रोल झाले आहेत.

इस्रायलचे राष्ट्रगीत ऐकल्यानंतर प्रेक्षकांना 'मेरा मुल्क मेरा देश' हे गाणं आठवलं. यामुळे नेटकऱ्यांनी अनु मलिक यांना ट्रोल करायला सुरुवात केली. एक नेटकरी म्हणाला, 'इस्रायलचं राष्ट्रगीत आणि 'दिलजले'या चित्रपटातील 'मेरा मुल्क मेरा देश मेरा ये चमन' गाण्यात थोडं साम्य आहे. तर अनु मलिकने या गाण्याला संगीत बद्ध केल्याने, मला आता १०० टक्के खात्री आहे की त्याने हे संगीत कॉपी केलं असणार.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अनु मलिकने इस्रायलचं राष्ट्रगीत कॉपी केलं कोण म्हणालं? मला तर वाटतं की ऑलिम्पिकमध्ये अनु मलिकचे 'मेरा मुल्क मेरा देश गाणं' हे अनु मलिकच्या सन्मासाठी लावलं होतं.'

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com