zollywood movies
zollywood moviesTeam Lokshahi

"झॉलीवूड" चित्रपटातून झाडीपट्टीची ३ जूनपासून मोठ्या पडद्यावर धमाल

झाडीपट्टी पहिल्यांदाच चित्रपट माध्यमात
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विदर्भात प्रचंड लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी या नाटकाच्या खास प्रकारावरची धमाल आत "झॉलीवूड" (zollywood) या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. बऱ्याच आंतररष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला हा चित्रपट (movie ) नव्या दमाचा दिग्दर्शक तृषांत इंगळेनं दिग्दर्शित केला असून, हा चित्रपट ३ जून रोजी प्रदर्शित होत आहे.

विशबेरी फिल्म्सच्या प्रियंका अगरवाल, अंशुलिका दुबे, शाश्वत सिंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून अमित मसूरकर आणि डयुक्स फार्मिंग फिल्म्स चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत तर न्यूटन, शेरनी, सुलेमानी किडा असे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केलेले अमित मसूरकर या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आणि प्रस्तुतकर्ते आहेत. विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकांविषयी उर्वरित महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. मात्र, झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहेच, पण झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे. त्यामुळे झॉलीवूडमधून पहिल्यांदाच झाडीपट्टी चित्रपटाच्या रुपात जगभरात पोहोचणार आहे.

चित्रपट तयार असूनही कोरोना प्रादुर्भावामुळे प्रदर्शित करता येत नव्हता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत असल्याचा आनंद आहे. "झॉलीवूड" हा माझा पहिलाच चित्रपट आहे झाडीपट्टी हा माझ्या हृदयाच्या जवळचा विषय आहे. या विषयाला चित्रपटातून न्याय देऊ शकलो याचं समाधान वाटतं, असं तृषांतनं सांगितलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com