बहुचर्चित ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले ?

बहुचर्चित ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले ?

Published by :
Published on

देशभरात सध्या 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटावरून मोठी चर्चा सूरू आहे. सोशल मिडीयापासून अनेकांच्या तोंडी याच चित्रपटाची चर्चा आहे. याचं चित्रपटावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाष्य केले आहे. जे सत्य अनेक वर्षे लोकांच्या समोर आणलं गेलं नव्हतं ते आता 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटाच्या माध्यमातून समोर आलं आहे, त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे लोक हैराण झाले आहेत अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केली आहे.

'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, "जे लोक या चित्रपटातील तथ्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, या चित्रपटाला विरोध करत आहेत तो केविलवाणा आहे. जे लोक स्वत:ला उदारमतवादी म्हणतात त्यांनी एका कलाकृतीला विरोध का करावा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच अशा प्रकारचे चित्रपट अजून निर्माण व्हावेत. अद्याप आणिबाणीवर एकही चित्रपट नाही, कारण सत्य दाबलं जातंय. देशाचं विभाजनावेळी अनेकांना वेदना सहन कराव्या लागल्या पण यावर एक चित्रपट नाही. पण आता कश्मीरमधील वेदनांवर चित्रपट निर्माण करण्यात आला आहे. देशाच्या विभाजनाच्या वेदना, आणिबाणीतील दु:ख आणि 'ऑपरेशन गंगा'वरही चित्रपट बनवण्यात यावेत, असे मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com