The Kashmir Files चे डायरेक्टर Vivek Agnihotri ला Y दर्जाची सुरक्षा
देशामध्ये सध्या तुफान चर्चेत असणाऱ्या 'द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)यांच्याबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. या चित्रपटासंदर्भात सुरु असणारा वाद लक्षात घेत विवेक अग्निहोत्री
(Vivek Agnihotri) यांना केंद्राने Y दर्जाची सुरक्षा दिली आहे.
'चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना Y दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ( CRPF)जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहे. विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी तसेच अभिनेत्री पल्लवी जोशी 'द काश्मीर फाइल्स'च्या निमित्ताने देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये दौरे करत आहेत. मात्र त्याचवेळी काश्मिरी पंडितांच्या विषयावर आधारित या चित्रपटावरुन बराच वाद सुरु आहे. एकीकडून या चित्रपटाला पाठिंबा मिळत असतांना दुसरीकडे या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे. त्यामुळेच ही सुरक्षा पुरवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
Y श्रेणी सुरक्षा म्हणजे काय?
Y श्रेणीच्या सुरक्षेमध्ये व्यक्तीच्या सुरक्षेसाठी एकूण 8 सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये ज्या व्हीआयपीला सुरक्षा दिली जाते, त्याच्या घरी पाच सशस्त्र स्टॅटिक गार्ड बसवले जातात. तसेच, तीन शिफ्टमध्ये तीन पीएसओ सुरक्षा देतात.