बॉलिवूडचा हा अभिनेता दारोदारी जाऊन विकायचा सौंदर्य प्रसाधने...
जीवनात नाव कमवायचे असेल तर संघर्ष करणे गरजेचे आहे. कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही. बॉलिवूड मध्ये अनेक कलाकार आयुष्यात खडतर प्रवास करूनच शिखरापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी संघर्ष हा अंतिम पर्याय आहे.
या संघर्षापैकी एक नाव म्हणजे अर्शद वारसी (arshad warsi) होय. उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अर्शदने जीवनात बऱ्याच संघर्षमय परिस्थितीचा सामना केला आहे.
'सर्किट', 'जॉली' अशा असंख्य भूमिका साकारुन अर्शद वारसीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र, प्रेक्षकांना हसवणाऱ्या या अभिनेत्याने खऱ्या आयुष्यात प्रचंड संघर्ष केला आहे. अर्शद १४ वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचं कर्करोगाने निधन झालं. वडिलांपाठोपाठ त्याच्या आईचंही दोन वर्षात निधन झालं. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर पडली.
वयाच्या १८ व्या वर्षी अर्शदने काम करण्यास सुरुवात केली असून सुरुवातीच्या काळात त्याने एका सौंदर्य प्रसाधनांच्या (cosmetics) कंपनीमध्ये सेल्समन म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्यांने लोकांच्या घरोघरी जाऊन सौंदर्यप्रसाधने विकली. त्यानंतर एका फोटो लॅबमध्ये काम केले. हे काम करत असतानाच त्याने त्याची नृत्याची आवडही जोपासली. अर्शदने मुंबईतील अकबर सामी यांचा डान्स ग्रुप देखील जॉइन केला. त्यानंतर 1987 साली 'ठिकाणा' आणि 'काश' चित्रपटात त्याने बँकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं.