Yuvraj Singh: लाखो लोकांच्या हृदयापर्यंतचा प्रवास गाठणाऱ्या युवराज सिंगचा बायोपिक आता लवकरच मोठ्या पडद्यावर...
भारतीय क्रिकेट संघातील सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणाऱ्या युवराज सिंगची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या आयुष्यावर बायोपिक येत असल्याची खबर सध्या सोशल मीडियावर जोर धरतं आहे. 2011 च्या विश्वचषकादरम्यान युवराज सिंग कर्करोगाला सामोरा जात होता. त्या परिस्थितीमध्ये असताना देखील भारताला विश्वचषक मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळेस युवराज सिंग वनडे वर्ल्डकप 2011 स्पर्धेत प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ठरला होता. त्याच्या या संघर्षाची आणि धैर्याची कहाणी लवकरच आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
युवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 2011 च्या विश्वचषकादरम्यान युवराज सिंगचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी होता. भूषण कुमार आणि रवि भागचंदका या चित्रपटाचे प्रोड्युसर आहेत. अद्याप या बायोपिकसाठी युवराज सिंगच्या भूमिकेत कोण दिसणार आहे याची माहिती समोर आलेली नाही. याआधी सचिन तेंडुलकर महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव या अष्टपैलू खेळाडूंच्या आयुष्यावर आलेले बायोपिक सर्वांनाच माहित आहेत. युवराज सिंगच्या या बायोपिकची एक पोस्ट त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्या पोस्टवर सुरेश रैना आणि इतर कलाकारांकडून अभिनंदन करण्यात आलेलं आहे. तसेच त्याच्या या बायोपिकची चाहत्यांना उत्सुकता असल्याचं देखील चाहत्यांनी कमेंटद्वारे व्यक्त केलं आहे.