जेठालालचे अतरंगी शर्ट तयार करायला लागतात ‘एवढे’ तास

जेठालालचे अतरंगी शर्ट तयार करायला लागतात ‘एवढे’ तास

Published by :
Team Lokshahi
Published on

गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा (tarak mehta ka ulta chashma). या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन केलं आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच यातील जेठालाल, दयाबेन, बबिता, सेक्रेटरी भिडे अशा काही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतल्या आहेत. यात खासकरुन जेठालालची सोशल मीडियावर (social media) कायम चर्चा होत असते.

या मालिकेतील प्रत्येक कलाकार एक विशिष्ट कारणाने प्रसिद्ध आहे. यामधील जेठालालची (Jethalal)  भूमिका साकारणारे दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी  प्रेक्षकांच्या मनावर घर केले असून जेठालालची खासकरून गुजराती (Gujarati) स्टाईल, गुजराती जेवण आणि विशेष करून त्यांच्या शर्टची स्टाईल (Style) प्रचंड चर्चेत असते.

मुंबईमधील (Mumbai) जीतू भाई लखानी (Jeetu Bhai Lakhani) हे गेल्या 14 वर्षापसून जेठालालचे कपडे डिझाइन करतात. विशेष म्हणजे प्रत्येक सण, उत्सवाप्रमाणे त्याचे शर्ट डिझाइन (Design) केले जातात. कार्यक्रमामध्ये एखाद्या नव्या भागाचे शुट करायचे असेल तर त्यांना पहिलेच सांगून तयारी सुरू करावी लागते. असं त्यांनी मुलाखतीत सांगतले.

जेठालालचे अतरंगी शर्ट शिवायला (2 तास) इतका वेळ लागतो, तसेच डिझाइन करायला (3 तास). एकंदरी पुर्ण शर्ट तयार होण्यासाठी (5 तास) लागते. तसेच जेठालालच्या कपड्यासारखे हुबेहुब कपडे शिवण्यासाठी खूपजण जीतू भाईंकडे मागणी करतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com