Surya Marathi Movie Review
Surya Marathi Movie Review

Surya Review : सुर्या एक हटके Action Movie

आपल्या कुटुंबाला गमावल्याची भावना मन सुन्न करणारी असते. अशीच कहाणी आहे सुर्याची. एक्शन, रोमान्स आणि हटके कहाणी असलेला हा चित्रपट आहे.
Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

आपल्या कुटुंबाला गमावल्याची भावना मन सुन्न करणारी असते. अशीच कहाणी आहे सुर्याची. एक्शन, रोमान्स आणि हटके कहाणी असलेला हा चित्रपट आहे. हसनैन हैद्राबादवाला दिग्दर्शित सुर्या हा एक एक्शनपट आहे. सुर्याची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसादने या चित्रपटातून आपले स्वर्गीय वडिल मंगेश यांना श्रद्धांजली वाहत त्यांचं स्वप्न पूर्ण केलय.

मंगेश ठाणगे यांनी लिहीलेली ही कथा आहे. तर विजय कदम यांनी पटकथा, संवादाची धुरा सांभाळली आहे. शिवाय मंगेश केदार, हेमंद एदलाबादकर यांनीही संवाद लेखन केलय. चित्रपटाची कहाणी ही सुर्याची आहे. सुर्या हा एक सैन्य अधिकारी आहे. तर आई, वडिल आणि बहिण असं त्यांचं सुखी आनंदी कुटुंब आहे. वडिल पोलीस हवालदार आहेत. सुर्या हा घरात सगळ्यांचं लाडका आणि त्यांची स्वप्न पूर्ण करणारा घरातला जबाबदार तरुण मुलगा. हे कुटुंब मात्र एका चाळीत राहतं. मात्र एका राजकीय नेत्याची आणि मोठ्या गुंडाची या चाळीवर नजर आहे. तर सुर्याच्या आयुष्यात काजल देखील आहे. जी सुर्याची प्रेयसी आहे. या सगळ्यात सुर्याच्या आयुष्यात एका मोठ्या घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळतो. यामुळे सुर्याचं आयुष्य कसं बदलतं ? यात त्याला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं ? हे या चित्रपटात दाखवण्यात आलय.

हसनैन हैद्राबादवाला यांनी या चित्रपटाच्या सादरीकरणात वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केलाय. मात्र विविध सीनच्या प्रवासातील सलगता हरवलेली जाणवते. अभिनेता प्रसाद मंगेश या चित्रपटातून सुर्या ही भूमिका साकारत असून त्याचं हे अभिनयातील पदार्पण आहे. पहिलाच चित्रपट असल्याने त्याचा चांगला प्रयत्न दिसतोय. मात्र अभिनय क्षमतेच्या अभावी भूमिका खुलवण्यात तो कमी पडलाय. असं असलं तरी एक्शनसाठीची त्याची मेहनत पडद्यावर दिसते. अभिनेत्री रुचिता जाधवने साकारलेली काजल मात्र लक्ष वेधून घेतेय. अभिनेता हेमंद बिर्जे हे रजाक या खलनायकाच्या भूमिकेत योग्य वाटतात. हॅरी जोश, अखिलेश मिश्रा, उदय टिकेकर या कलाकारांनी साकारलेल्या नकारात्मक खलनायकी भूमिका विशेष लक्ष वेधतात. तर अरुण नलावडे, उदया टिकेकर, पंकज विष्णू, प्रदीप पटवर्धन, आर्या पाटील, संदेश भोसले यांच्या भूमिकाही लक्षवेधी आहेत.

चित्रपटातील एक्शन लक्ष वेधून घेणारी आहे. अब्बास अली मोगल आणि मोझेस फर्नांडिस हे याचे एक्शन डिरेक्टर आहेत. तर देव चौहान यांचं संगीतही छान झालय. सुखविंदर सिंह, आदर्श शिंदे, नेहा राजपाल, कविता राम यांनी गायलेली गाणी विशेष लक्ष वेधतात. या चित्रपटातील पार्श्वसंगीत चित्रपटाच्या कथेला साजेसं आहे. मधु.एस.राव यांच्या छायांकनात वेगळेपणा जाणवतोय. तर राहुल भातणकर यांना संकलनात बऱ्याच गोष्टींना वाव होता. सीन्समधील सलगता कायम ठेवण्यात संकलतान त्रुटी जाणवतात. सुर्या हा एक एक्शनपट असून हटके कहाणी आणि ट्विस्ट समोर आणतो.

रेटिंग2.5 स्टार्स

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com