मनोरंजन
Suraj Yengde: सूरज एंगडे यांची हॉलीवूडमध्ये एन्ट्री!
पुरस्कार विजेत्या दिग्दर्शक अवा डुव्हर्ने बुधवारी व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पर्धेत चित्रपट सादर करणारी पहिली आफ्रिकन अमेरिकन महिला ठरली.
पुरस्कार विजेत्या दिग्दर्शक अवा डुव्हर्ने बुधवारी व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पर्धेत चित्रपट सादर करणारी पहिली आफ्रिकन अमेरिकन महिला ठरली. पुलित्झर पारितोषिक विजेत्या पत्रकार इसाबेल विल्करसन यांनी लिहिलेले पुस्तक कास्ट: द ओरिजिन ऑफ अवर डिसकॉन्टेंट्स या पुस्तकावर ओरिजिन हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमात प्रसिध्द भारतीय लेखक सुरज येंगडे यांनीही महत्वाची भूमिका वठवली आहे. भारतातील दलित, जर्मनीमधील नाझीवाद आणि अमेरिकेतील दक्षिण राज्यांमध्ये जिम क्रो वांशिक भेदभाव नियमावर हा सिनेमा बनविण्यात आला आहे. इतिहासात काही समाजातील लोकांना कशा प्रकारे अपमानित करण्यात आले आहेत हे दाखवण्यात आले आहे. व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पर्धेत ओरिजिन हा चित्रपट दाखवून झाल्यानंतर सर्व दर्शकांनी उभे राहून चित्रपटाचे कौतुक करण्यात आले.