Sunny Leone
Sunny LeoneTeam Lokshahi

Sunny Leone : सनीने शेअर केलेला 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल

सनी लिओनी सोशल मिडियाच्या माध्यमातून वेळोवेळी काही ना काही शेअर करत असते.
Published by :
shamal ghanekar
Published on

बेबी डॉल म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) हिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. सनी लिओनी सोशल मिडियाच्या माध्यमातून वेळोवेळी काही ना काही शेअर करत असते. ती तिच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यातील काही खास क्षण फोटो किंवा व्हिडिओमधून सोशल मिडियावर शेअर करत असते. अशाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

सनीने नुकताच इंस्टाग्राम आकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. सध्या हा व्हिडीओ (Video) प्रचंड चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ जितका व्हायरल झाला आहे, तितकाचं तो मजेदारही आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकालाच हसू येईल.

Sunny Leone
‘आमदार निवास’मध्ये सनी लियोनी; ‘शांताबाई’ गाण्यावर थिरकणार

या व्हिडिओमध्ये सनी लिओनी स्विमिंग पूलच्या किनाऱ्यांवरून चालताना दिसत आहे. सनी लिओनी बाथ रोब घालून स्विमिंग पूलच्या किनाऱ्यानं चालत आहे. त्याचवेळी तिचा मित्र अचानक तिथे येतो आणि सनीचं त्याच्याकडे लक्ष नसल्याने तो तेवढ्यात तिचा मित्र तिला धक्का मारून स्विमिंग पूलमध्ये पाडतो. यामुळे सनी मात्र स्विमिंग पूलमध्ये पडते आणि सनी पूर्ण भिजते.

सनीने इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केलेला व्हिडिओ सोशल मिडियावर कमी वेळेत चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. तसेच चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक खूप केले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेत आहे.

Sunny Leone
Sunny Leone Birthday: असा आहे सनी लियोनीचा प्रवास
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com