मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.
Published on

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांच्या निधनानं सगळीकडे शोक व्यक्त करण्यात आला आहे. अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका निभावल्या आहेत. 'मराठी तितुका मेळवावा' या चित्रपटात सुलोचना लाटकर जिजाऊ यांच्या भूमिकेकत झळकल्या होत्या. सिनेसृष्टीत त्यांना सुलोचना दीदी म्हणून ओळखले जात होते.

सुलोचना दीदी या गेल्या काही महिन्यांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर बराच काळ रुग्णालयात उपचार सुरू होते. सुलोचना दीदी यांच्या मृत्यूला त्यांच्या नातेवाईकांनी दुजोरा दिला आहे. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत त्यांच्या प्रभादेवी निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुलोचना लाटकर यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'मराठा तितुका मेळावा', 'मोलकरीण', 'बाळा जो रे', 'सांगते ऐका', 'सासुरवास', 'वहिनीच्या बांगड्या' या त्यांच्या गाजलेल्या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. यासोबतच सुलोचना यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

सुलोचना यांना 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कार, 2004 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि 2009 मध्ये महाराष्ट्र सरकारकडून प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com