'विलक्षण देखणे, मराठी मधील हॅण्डसम नायक...'; सुबोध भावेनं रवींद्र महाजनी यांना वाहिली श्रद्धांजली
मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. राहत्या घरातच त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव आंबी एमआयडीसी येथील सोसायटीमध्ये महाजनी राहायचे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ते येथील एका सदनिकेत भाडेतत्वावर राहत होते. याच घरामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. मात्र दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अभिनेता सुबोध भावे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुबोध भावे म्हणाले की, मराठी चित्रपटातील माझं व्यावसायिक अभिनेता म्हणून पहिलं पाऊल रविंद्र महाजनी यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेल्या " सत्तेसाठी काहीही " या चित्रपटातून पडले. अतिशय रूबाबदार, विलक्षण देखणे, खऱ्या अर्थाने मराठी मधील handsome नायक , कायम हसतमुख अशीच तुमची प्रतिमा कायम मनात कोरली गेली आहे. दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. असे म्हणत सुबोध भावेंनी श्रद्धांजली वाहिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ते तळेगाव दाभाडे इथल्या एका सदनिकेत भाडेतत्त्वावर राहत होते. ते राहत असलेल्या सदनिकेतून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. महाजनी यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी मुंबईत राहतो.