'सुभेदार'ची शिवगर्जना प्रेक्षकांपर्यंत पोहोचली; दुसऱ्या दिवशीही चित्रपटाची कोट्यवधींची कमाई
दिग्पाल लांजेकर यांच्या शिवअष्टक मालिकेतील पाचवं पुषक असलेला 'सुभेदार' हा चित्रपट शुक्रवारी म्हणजे २५ ऑगस्टला प्रदर्शित झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपणीचे मित्र तानाजी मालुसरे यांच्या कोंढाण्याच्या लढाईवर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच रेकॉर्ड करत प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंग देखील मोठ्या प्रमाणात झाले होते. तर आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुलचे बोर्ड लागले आहेत. दोन दिवसात चित्रपटाने कोट्यवधींचे कलेक्शन केले आहे.
शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची सध्या माऊथ पब्लिसिटी सुरू आहे. हा चित्रपट आवडल्याने प्रेक्षक त्याचं आता मनापासून कौतुक करत आहेत. पहिल्याच दिवशी चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्याचं दिवशीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १ कोटी ५ लाखांची कमाई करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आता दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने पहिल्या दिवसापेक्षाही जास्त कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अनेक ठिकाणी शो हाऊसफुल असल्याचे दिसून आले. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी तब्बल १ कोटी ७५ लाखांची कमाई केली असल्याचं सांगण्यात येतंय. एका वेबसाइटने ही माहिती दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाने २ कोटी ८० लाखांचा गल्ला जमवला आहे. दोन दिवसात हा चित्रपट ३ कोटींच्या आसपास पोहोचला आहे. त्यामुळे या वीकेंडला 'सुभेदार' ४ कोटींचा आकडा पार करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे
'सुभेदार'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार 'सुभेदार' चित्रपटाने दोन दिवसात २.७४ कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. 'सुभेदार' चित्रपटाने पहिल्या दिवशी १.०५ कोटी, दुसऱ्या दिवशी १.६९ कोटींचे कलेक्शन केले आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी हा चित्रपट १.८० कोटींची कामे करू शकतो असे अहवालात म्हटले आहे. चित्रपटाचे पहिल्या दिवशी कलेक्शनपेक्षा दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन जास्त आहे.