झी, स्टार, सोनी यांसारख्या बड्या चॅनल्सचे प्रक्षेपण बंद, प्रेक्षक संभ्रमात
झी, सोनी आणि स्टार नेटवर्कच्या मोठ्या वाहिन्यांचे प्रक्षेपण शनिवारी सायंकाळपासून पूर्णपणे बंद झाले आहे. त्यामुळे केबल रिचार्ज करूनही प्रेक्षकांना टीव्हीवर चॅनेल पाहता येत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, ट्रायने जारी केलेल्या नवीन ऑर्डर (NTO 3.0) अंतर्गत या चॅनेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. याविरोधात केबल संघटना एकटवली आहे.
स्टार, सोनी आणि झी सारख्या मोठ्या ब्रॉडकास्टर्सनी केबल टीव्ही पुरवणाऱ्या प्लॅटफॉर्मवरील चॅनेलच्या किमती वाढवण्याची अट ठेवली होती. यानुसार 15 फेब्रुवारी रोजी, ब्रॉडकास्टर्सनी केबल ऑपरेटरना प्रादेशिक नियामकद्वारे जारी केलेल्या नवीन टॅरिफसाठी इंटरकनेक्ट ऑफर (RIO) वर स्वाक्षरी करण्यासाठी नोटिस जारी केल्या होत्या. यावर स्वाक्षरी करण्यासाठी केबल टीव्ही प्लॅटफॉर्मला केवळ 48 तासांची नोटीस देण्यात आली होती.
परंतु, यावर स्वाक्षरी करण्यास सर्वोच्च संस्था ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशन (AIDCF) यांनी नकार दिला आहे. यामुळे स्टार, सोनी आणि झी सारख्या मोठ्या प्रसारकांनी चॅनेल डिसकनेक्ट केले आहेत. या निर्णयामुळे देशभरातील सुमारे साडेचार कोटी कुटुंबे केबल टीव्हीवर या मनोरंजन वाहिन्या पाहण्यापासून वंचित झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशन (AIDCF) ने म्हणाले की, ट्रायच्या निर्णयामुळे खर्च 25 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढेल आणि वापरकर्त्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागतील जातील. यावर कायदेशीर मार्ग काढण्याचा विचारात आहेत, असे त्यांनी सांगितले