सोनू सूदने सरकारला ओडिशा रेल्वे अपघातग्रस्तांसाठी केलं अनोखं आवाहन!

सोनू सूदने सरकारला ओडिशा रेल्वे अपघातग्रस्तांसाठी केलं अनोखं आवाहन!

ओडिशा रेल्वे अपघाताच्या बातमीने शनिवारची सकाळ संपूर्ण देशासाठी धक्कादायक ठरली आहे.
Published on

ओडिशा रेल्वे अपघाताच्या बातमीने शनिवारची सकाळ संपूर्ण देशासाठी धक्कादायक ठरली आहे. या हल्ल्यात 200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि 900 हून अधिक जण जखमी झाले. भारतीय चित्रपट इंडस्ट्री, कलाकार सगळेच सोशल मीडिया वरून त्यांचं दुःख व्यक्त करत असून पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पाठिंबा देत आहेत. या सगळ्या प्रकारात अभिनेता सोनू सूद पीडितांच्या कुटुंबासाठी काहीतरी अनोखी मदत करण्याची इच्छा बाळगत आहे.

अभिनयाच्या सोबतीने गरजूंना मदत करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारा अभिनेता सोनू सूद ओळखला जातो. या अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्याने अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आणि पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना पाठींबा दिला आहे.

या व्हिडिओमध्ये सोनूने सांगितले की, पीडितांना भरपाई दिली जाऊ शकते. परंतु, दीर्घ काळासाठी त्यांचे आयुष्य सुरक्षित राहण्यासाठी त्याने राज्य आणि केंद्र सरकारला हात जोडून अशा दुःखद अपघातातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी काही निश्चित उत्पन्न धोरण तयार करण्यात यावं, असं आवाहन केले.

सोनू म्हणतो की, सरकारकडून नियमित आर्थिक मदत मिळाल्याने ज्या लोकांनी आपली जवळची लोक गमावली त्यांना दीर्घकाळ त्रास होणार नाही याची खात्री घेतली जाईल. सोनूने या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com