Anuradha Paudwal: गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर 2024 पुरस्कार जाहीर

Anuradha Paudwal: गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर 2024 पुरस्कार जाहीर

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले असून, सन 2024 च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले असून, सन 2024 च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. यासोबतच, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कारांची व बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांची समिती या पुरस्कारांची शिफारस करत असते. विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून सर्व पुरस्कारार्थींचे मंत्री मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.

शुभदा दादरकर यांना यंदाचा 'संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव 2024' जाहीर झाला आहे. त्यांना संगीत रंगभूमीसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल 2024चा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ संजय महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे. 'तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार 2024' साठी शशिकला झुंबर सुक्रे यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ हा 10 लाख रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र दिले जाणार आहे. अनुराधा पौडवाल यांच्या आवाजाने अनेक हिंदी,मराठी गाणी सदाबहार झाली आहेत. अनुराधा पौडवाल या दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल यांच्या पत्नी आहेत. त्यांची संगीत क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख आहे. यापूर्वी त्यांना भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com