KK
KKteam lokshahi

Video: ‘हम रहें या न रहें कल…’ ठरलं ‘केके’चं शेवटचं गाणं

कॉन्सर्टमधील शेवटचे काही क्षण झाले Viral
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी (31 मे) रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्याचं रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी निधन झालं. तो ५३ वर्षांचा होता. विशेष म्हणजे तासाभरपूर्वी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर 'हम रहें या न रहें कल…’ हे गाणं गात असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. कॉनसर्टमधील हा केके यांचा शेवटचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

केके कोलकात्यामधील गुरुदास कॉलेजमधील नाझरुल मंचच्या कार्यक्रमामध्ये गात असतानच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो त्याच्या हॉटेल रुममध्ये परतला. मात्र त्याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला ब्रॉट डेड म्हणजेच रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, असं घोषित केलं. केकेच्या मृत्यूनंतर गुरुदास कॉलेजमधील त्याच्या कॉन्सर्टचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

याच कॉलेजच्या फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या या कॉन्सर्टमधील शेवटच्या काही मिनिटांमध्ये केके ‘कल हम रहे न रहें कल.. याद आऐंगे ये पल…’ गाणं गाताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. ‘यारों दोस्‍ती बड़ी ही हसीन है…’ हे गाणंही त्याने या कॉन्सर्टमध्ये गायलं होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com