Sidharth Shukla | सिद्धार्थ शुक्लाच्या शवविच्छेदन अहवालावर डॉक्टरांमध्ये मतभेद

Sidharth Shukla | सिद्धार्थ शुक्लाच्या शवविच्छेदन अहवालावर डॉक्टरांमध्ये मतभेद

Published by :
Published on

बिग बॉस 13' फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) पार्थिवावर आज (शुक्रवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल (गुरुवारी) हृदयविकाराच्या धक्क्याने सिद्धार्थचे निधन झाले होते. सिद्धार्थला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते, जिथे डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचा अहवाल डॉक्टरांनी पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. मात्र त्यावरुन डॉक्टरांमध्ये मतभेद असून कुठलाच अंतिम निष्कर्ष काढला गेला नसल्याची माहिती आहे.

दुपारी पार्थिवावर अंत्यसंस्कार
सिद्धार्थ शुक्लाचे पार्थिव कूपर हॉस्पिटलमधून ब्रह्मा कुमारी जुहू कार्यालयात नेण्यात येईल, तिथे पूजा केल्यानंतर त्याचे पार्थिव ओशिवारा भागातील घरी आणले जाईल. सिद्धार्थ शुक्लाच्या घराबाहेर पोलीस तसेच खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. सिद्धार्थच्या चाहत्यांनी त्यांच्या घराबाहेर पोस्टर लावून श्रद्धांजली वाहिली आहे. शोकाकुल चाहत्यांनी साश्रू नयनांनी त्याच्या घराबाहेर गर्दी केली होती. आज दुपारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

झोपण्यापूर्वी औषधांचे सेवन
दरम्यान, सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधं सेवन केली होती, त्यानंतर तो सकाळी उठलाचा नाही. डॉक्टरांनी अहवालात हार्ट अटॅकमुळे त्याच्या मृत्यूची पुष्टी केली असताना, आणखी एक गोष्ट समोर आली आहे. या माहितीनुसार, काल रात्री सिद्धार्थ शुक्ला ज्या गाडीने फ्लॅटवर पोहोचला, त्या बीएमडब्ल्यू कारची मागील काच फुटलेली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com