Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरचा इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड! मोदींसह देसी गर्लला ही टाकले मागे

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरचा इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड! मोदींसह देसी गर्लला ही टाकले मागे

श्रद्धा कपूरने आजवर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शक्ती कपूरची मुलगी असूनही तिनी तिची अशी वेगळी ओळख चाहत्यांमध्ये निर्माण केलेली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

श्रद्धा कपूरने आजवर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शक्ती कपूरची मुलगी असूनही तिनी तिची अशी वेगळी ओळख चाहत्यांमध्ये निर्माण केलेली आहे. सोशल मीडियावर तिची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तितकाच तिचा चाहतावर्ग ही मोठ्या संख्येने पाहायला मिळतो. नुकताच तिचा 'स्त्री 2' चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित झाला. 'स्त्री 2' ने आतापर्यंत खूप मोठी कमाई केली आहे आणि सर्वात जास्त कमाई करणा-या चित्रटांच्या यादीत या चित्रपटाने आपला पल्ला गाठला आहे. हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'स्त्री 2' या चित्रपटादरम्यान श्रद्धा कपूर चर्चेत आलीच होती की, तिच्या बद्दल आणखी एक बातमी समोर आली आहे.

श्रद्धा कपूरने इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये देशाच्या पंतप्रधानांसह भारताची मिस वर्ल्ड आणि जिला देसी गर्ल असे देखील म्हटले जाते अशी प्रियंका चोप्रा या दोघांना ही मागे टाकलेलं आहे. श्रद्धा कपूरने इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या यादीत टॉप 3 मध्ये आली आहे. सध्या तिच्यापेक्षा एक पाऊल पुढे भारताचा क्रिकेटर विराट कोहली हा आहे. श्रद्धा कपूरचे इन्स्टाग्रामवर 92.1 मिलियन फॉलोअर्स आहेत तर प्रियंका चोप्राचे 91.8 मिलियन फॉलोअर्स आहेत त्याचसोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 91.3 इतके आहेत.

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याचे आहेत तो पहिल्या क्रमांकावर असून इन्स्टाग्रामवर त्याचे २७० मिलियन फॉलोअर्स आहेत. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमाकांवर असणारे नरेंद्र मोदी आणि प्रियंका चोप्रा यांना मागे टाकत आता श्रद्धा कपूरने आपली ओळख जगभर लेकप्रिय केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com