'शिरच्छेद प्रेमाचा' चित्रपट जून महिन्याच्या अखेरपर्यंत प्रदर्शित होणार
'शिरच्छेद प्रेमाचा' हा चित्रपट भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण कलाकारांना घेऊन बनवण्यात आला आहे. या चित्रपटाच्या 50 मिनिटांच्या प्रीमियर शोचे आयोजन भंडारा येथील सार्वजनिक वाचनालयात करण्यात आले होते. शिरच्छेद प्रेमाचा या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण मोहारे यांनी चित्रपटात कोरोना काळात हरवलेली माणुसकी, मजुरांची झालेली दुरावस्था, पायपीट व हालअपेष्टा. तसेच या काळात युवकांची वाढलेली फरफट, हाताला नसलेलं काम त्यामुळे वाढलेल्या बेरोजगारी या सर्व बाबींचे दारुण चित्रण केले आहे.
चित्रपटातील हिरो भिम्याचे प्रेम बहरन्यापूर्वीच एक प्रेमिका स्वःताला कशी संपवते. तर दुसरी प्रेमीका आयपीएस अधिकारी, गोळ्या झाडून तिला मारले जाते. याचे छान चित्रण केले गेले आहे. हा चित्रपट भंडारा जिल्ह्यात शूट केला गेला असून जिल्ह्यात अनेक स्पॉट असे आहेत की, जिथे चित्रपट चित्रीकरण केल्या जाऊ शकते. तसेच लाईट, कॅमेरा, अँक्शन म्हटल, तर मुंबई असा उल्लेख येतो. मात्र आता भंडारा जिल्ह्यात सुद्धा चित्रपट चित्रीकरण करून जिल्ह्यातील कलाकारांना वाव मिळाला आहे.
प्रेमाचा शिरच्छेद या चित्रपटात भंडारा जिल्ह्यातील 150 ग्रामीण कलाकारांनी पहिल्यांदाच काम केले आहे. झाडी बोली भाषा त्यांची वागणूक, बोलण्याची लय यात ग्रामीण तडका मारलेला आहे.