शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विभक्त होणार? 'या' ट्वीटमुळे चर्चा

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विभक्त होणार? 'या' ट्वीटमुळे चर्चा

'यूटी 69' या सिनेमाच्या माध्यमातून राज कुंद्रा सिनेसृष्टीत अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

'यूटी 69' या सिनेमाच्या माध्यमातून राज कुंद्रा सिनेसृष्टीत अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजून एक चर्चा रंगली आहे ती म्हणजे राज कुंद्रा याच्या ट्विटची.

राज कुंद्रा याने ट्विट केलं आहे की, "आम्ही वेगळे झालो आहोत आणि या कठीण काळात तुम्ही आम्हाला वेळ द्यावा ही विनंती" असे राजने ट्विट केलं आहे. शिल्पाने याबद्दल काही माहिती दिली नाही आहे.

राजने सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त झाल्याचं जाहीर केलं आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी 2009 मध्ये लग्नबंधनात अडकले. मात्र आता राजच्या या ट्विटने चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज कुंद्राच्या या ट्विवर नेटकऱ्यांच्या अनेक कमेंट्स येत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com