Jersey
JerseyTeam Lokshahi

शाहिद कपूरला धक्का; प्रदर्शनानंतर 1 तासात लीक झाला 'Jersey'

बॉक्स ऑफिस कलेक्शनला मोठा धक्का बसण्याची शक्यता
Published by :
Published on

शाहिद कपूरचा (Shahid kapoor) 'जर्सी' (Jersey) हा सिनेमा २२ एप्रिल २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आणि तासाभरात ऑनलाइन लीकही (Leak) झाला आहे.

सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला (Box office collection) याचा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 'जर्सी' हा चित्रपट तेलुगु (Telugu) सिनेमाचा हिंदी रीमेक (Hindi remake) असून सिनेमाचं टायटल हिंदीत रीमेक करताना बदललेलं नाही. गौथम तिन्नानुरीने (Gautham Tinnanuri) या हिंदी रीमेकचं दिग्दर्शन करण्याची जबाबदारी उचलली आहे. तेलुगु मध्ये देखील गौथम तिन्नानुरीनंच जर्सीचं दिग्दर्शन (Directing) केलं होतं. तर, नानी या तेलुगु सुपरस्टारनं ओरिजनल तेलुगु 'जर्सी' मध्ये मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारली होती.

शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांच्या बहुचर्चित 'जर्सी' सिनेमाला प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकचं नाही तर सेलिब्रिटी सर्कलमधूनही सिनेमाला चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. पण आता प्रदर्शनानंतर सिनेमा पायरसीचा शिकार झाल्याच्या वृत्तानं निर्माते मात्र मोठ्या संकटात सापडले आहेत.

Jersey
PHOTOS : आलियानंतर आता जान्हवी कपूर वधूच्या लूकमध्ये

सिनेमाचं प्रदर्शन गेल्या वर्षीच्या डिसेंबरपासून लांबणीवर पडलं होतं. आता कुठे सिनेमाला प्रदर्शनाचा मुहूर्त मिळाला आणि प्रतिसादही चांगला मिळत होता, परंतु सिनेमा लीक झाल्याने वेगळंच टेन्शन निर्माण झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com