Sameer Wankhede : ज्यांना तुम्ही सेलिब्रिटी वगैरे म्हणता ते...; वानखेडे असं का म्हणाले?

Sameer Wankhede : ज्यांना तुम्ही सेलिब्रिटी वगैरे म्हणता ते...; वानखेडे असं का म्हणाले?

छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या बहुचर्चित शोचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या बहुचर्चित शोचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तब्बल १० वर्षांनंतर हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये अनेक कलाकार, राजकीय नेते हजेरी लावत आहेत.

याच शोमध्ये आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी उपस्थिती लावली आहे. या कार्यक्रमात त्यांना अवधून गुप्ते यांनी प्रश्न विचारला की, ‘सेलिब्रिटींना विमानतळावर सर्वात जास्त भीती समीर वानखेडे या नावाची वाटायची. खूप लोक म्हणायचे की वानखेडे मुद्दाम सेलिब्रिटींची जास्त तपासणी करायला लावतात.

यावर उत्तर देत समीर वानखेडे म्हणाली की, माझ्यासाठी सेलिब्रिटी बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ आणि एपीजे अब्दुल कलाम आहेत. एअरपोर्टवर असताना जवळपास साडेतीन हजार केसेस होत्या. त्यापैकी तुमच्या भाषेत ज्यांना तुम्ही सेलिब्रिटी वगैरे म्हणता ते किती असतील, फक्त ५०, १००, १५०. बाकीचे लोक कोण आहेत? बाकीचे लोक हे गंभीर गुन्हेगार, ड्रग पेडलर्स असतात. त्यांच्याबद्दल कुणीच काही सांगत नाही. असे वानखेडे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com