घटस्फोटाच्या निर्णयानंतर समंथा आणि नागा चैतन्य आमने-सामने
अभिनेत्री समंथा आणि नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ते सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत होते. घटस्फोटाच्या निर्णयानंतर आता दोघेही आमने-सामने आले आहेत. रामनायडू स्टुडिओमध्ये दोघेही एकत्र दिसून आले होते .
समंथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच रामनायडू स्टुडिओमध्ये दोघेही एकत्र दिसून आले. त्यामुळे त्यांच्या नात्यावर चाहते अनेक तर्क-वितर्क लढवत आहेत. हरी आणि हरीशने दिग्दर्शित केलेल्या समंथाच्या यशोदामध्ये रलक्ष्मी सरथकुमार आणि उन्नी मुकुंदन यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत. याच सिनेमाच्या शूटिंगसाठी समंथा स्टुडिओमध्ये गेली होती. दरम्यान नागाचेदेखील त्याच स्टुडिओमध्ये बंगाराजू सिनेमाचे शूटिंग सुरू होते. या भेटीत दोन्ही कलाकारांनी एकमेकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले . समंथा आणि नागा चैतन्य 2017 साली लग्नबंधनात अडकले होते. पण आता चार वर्षांनी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. समंथा आणि चैतन्यने काही दिवसांपूर्वी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली होती. दरम्यान समंथाने तिच्या नावातून अक्किनेनी आडनाव काढून टाकले होते .
समंथा आणि नागा चैतन्यची अशी होती लव्ह स्टोरी
'ये माया चेसावे' या दाक्षिणात्य चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान समंथा आणि नागा चैतन्यची भेट झाली. त्यानंतर 'ऑटोनगर सूर्या' या चित्रपटाच्या सेटवर ते पुन्हा भेटले. 6 ऑक्टोबर 2017 रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले.