जागतिक भिकारी...; सुनिल शेट्टीच्या ट्विटवर सदाभाऊ खोतांची टीका
टोमॅटोच्या किंमती दिवसेंदिवस गगनाला भिडत असून सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडत आहे. परंतु, दुसरीकडे बऱ्याच वर्षांनी टोमॅटोला भाव मिळाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
टोमॅटोच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत असून सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडत आहे. टोमॅटो भाववाढीवर अनेक सेलिब्रिटी भाष्य करत आहेत. अशातच प्रख्यात बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांनी टोमॅटो भाववाढीवर काही दिवसांपुर्वी वक्तव्य केलं होतं. 'आजकाल मी टोमॅटो कमीच खातो, लोकांना वाटते की मी सुपरस्टार असल्याने या गोष्टीचा माझ्यावर परिणाम होणार नाही. परंतु असं नाही आहे, आम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागते' असे वक्तव्य सुनील शेट्टी यांनी केले. त्यावर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिलं आहे.
सुनील शेट्टी हा सडक्या डोक्याचा आहे, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी त्याला जागतिक भिकाऱ्याची उपमा दिली. शेतकऱ्याला कधीतरी चांगला दर मिळाला तर तुमच्या सारख्या जागतिक भिकाऱ्याच्या पोटात दुखतं. सुनील शेट्टी तुम्ही बाजारू कलावंत आहात. सुनील शेट्टी भीक मागायला आला तर त्याच्या कटोऱ्यात सडकी टोमॅटो टाका, अशी टीका खोतांनी केली.