S.S Rajamoli
S.S RajamoliLokshahi Team

RRR : चित्रपटाबद्दल अशी काही चर्चा...

एसएस राजामौली दिग्दर्शित आरआरआर हा या वर्षातील उत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
Published by :
Published on

एसएस राजामौली (S.S Rajamoli) दिग्दर्शित आरआरआर हा या वर्षातील उत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. २५ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या ब्लॉकबस्टर चित्रपटात राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr.NTR) यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्याचबरोबर अजय देवगण (Ajay Devgan) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली असून प्रेक्षकांनी त्याचं कथानक, गाणी, उत्तम व्हिज्युअल इफेक्ट्स याचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे.

S.S Rajamoli
RRR | प्रदर्शनाआधीच ‘RRR’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई

यामधील राम चरण आणि ज्युनियर एनटीआरची मैत्री सर्व प्रेक्षकांना खूप भावली. मात्र त्यांची 'मैत्री' पाश्चिमात्य देशांत वेगळ्या पद्धतीने पाहिली जात आहे. तिथल्या लोकांना समजले आहे की RRR हा एक गे चित्रपट आहे आणि या दोन अभिनेत्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री त्यांना 'रोमान्स' वाटत आहे. याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाबद्दल पाश्चिमात्य देशातील लोक काय विचार करत आहेत ते आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. आरआरआर या चित्रपटातील राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या केमिस्ट्रीबद्दल लोक काय विचार करत आहेत हे सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला प्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी याबद्दल असं बोलले आहे की हे कथानक गे असल्यासारखं वाटतं. RRR ही समलिंगी कथा असल्याची पाश्चात्य प्रेक्षकांची धारणा आहे.

S.S Rajamoli
‘RRR’ | 3 दिवसात जगभरात 500 कोटींहून अधिक कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com