Rohit Pawar : विरोधात व्हिडिओ टाकला म्हणून ट्विटर ची ब्लू टिक काढायची, हे...
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने थेट देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधला होता.यानंतर आता ट्विटर अकाउंटवरील व्हेरीफेकीशनची ब्लू टिक काढण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, विरोधात व्हिडिओ टाकला म्हणून ट्रोल गँग वापरून ट्रोल करायचं, ट्विटर ची ब्लू टिक काढायची, हे अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण आहे. अशाप्रकारे कुणाकुणाचा आवाज दाबणार?
तसेच इतका कपटीपणा योग्य नाही. प्रत्येकाला विचारधारेचं, आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि मुलभूत अधिकारही आहे, परंतु सत्तेचा गैरवापर करून आपण हा मुलभूत अधिकारही हिरावून घेणार का? असा सवाल रोहित पवारांनी विचारला आहे.
काय आहे तेजस्विनी पंडित पोस्ट?
माझ्या X (ट्विटर) अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं, कारण का तर मी एक ‘आम्हा जनतेची' इतकी वर्ष फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून? X (टूट्विटर ) अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात त्याबद्दल धन्यवाद, असा टोला तेजस्विनीने लगावला आहे. पण ह्या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही.
सामान्यांचा आवाज बंद करणे हाच ह्यांचा बहुदा एकमात्र 'X' फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा ‘जय हिंद जय महाराष्ट्र' साठीचा घोष योग्य वेळी सुरूच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत ! जेंव्हा जेंव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदूमणारच आहे, असेही तिने म्हंटले आहे.