Sushant Singh Rajput Case : सुशांत सिंह राजपूतला रिया चक्रवर्तीनेच ड्रग्ज अॅडिक्ट बनवलं; NCB नं सादर केले आरोपपत्र
अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. जवळपास दोन वर्ष झाले तरी या प्रकरणाचा अद्याप छडा लागलेला नाही आहे. याच पार्श्वभूमीवर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं आरोपपत्राचा मसुदा न्यायालयासमोर सादर केला आहे. या आरोपपत्रामध्ये सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, सुशांतच्या घरी काम करणारे दोन कर्मचारी आणि इतर अशा एकूण ३५ आरोपींची नावं या मसुद्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या आरोपींनी मिळून सुशांतला ड्रग्ज पुरवलं आणि त्याला ड्रग्जचं व्यसन लावण्यात आले. असा दावा करण्यात आला आहे.
२०२०मध्ये सुशांत (Sushant Singh Rajput) किंवा रिया चक्रवर्तीच्या (Riya Chakraborty) मागणीवरून त्यांना ड्रग्ज पुरवलं जात होतं. रिया चक्रवर्ती गांजा खरेदी करून सुशांतपर्यंत पोहोचवत होती. तर सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी सुशांतच्या बँक अकाऊंटमधून पूजा सामग्रीच्या नावाखाली ड्रग्जची खरेदी करत होता, असा देखील उल्लेख एनसीबीच्या मसुद्यात करण्यात आला आहे.