Riteish Deshmukh Birthday: रितेशसाठी सोपं नव्हतं पहिला सिनेमा मिळवणं वडील मुख्यमंत्री होते तरी

Riteish Deshmukh Birthday: रितेशसाठी सोपं नव्हतं पहिला सिनेमा मिळवणं वडील मुख्यमंत्री होते तरी

Published by :
Published on

अभिनेता रितेश देशमुख चा आज वाढदिवस आहे. रितेश आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया डिसूजा ही जोडी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दोघांमधील प्रेम त्यानंतर लग्न आणि आतापर्यंतचा प्रवास जबरदस्त आहे. मात्र या दोघांना ज्या सिनेमानं आयुष्यभरासाठी एकत्र आणलं तो सिनेमा म्हणजे तुझे मेरी कसम. हा सिनेमा रितेशला कसा मिळाला याची स्टोरी त्यानं माझा कट्टा कार्यक्रमात सांगितली होती .

रितेशनं सांगितलं होतं की, तुझे मेरी कसम हा सिनेमा माझ्या आधी जिनिलियाला मिळाला. हा सिनेमा दुसरा अभिनेता करणार होता. तो अभिनेता त्यावेळी दुसरा सिनेमा करत होता. त्यावेळी त्या अभिनेत्याला एका सिनेमाची निवड करायला सांगितलं गेलं. त्यावेळी त्यानं दुसरा चित्रपट निवडला. मग या सिनेमासाठी निर्मात्यांना जिनिलियासोबत एक फ्रेश चेहरा हवा होता. मी एकदा सुभाष घई यांच्या सेटवर गेलो होतो. कारण मला फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटवर प्रोजेक्ट बनवायचा होतो. मला स्टुडिओ वगेरे काही माहिती नव्हतं. त्या कामासाठी गेलो असता तिथल्या डीओपीला वाटलं मी चित्रपटात अॅक्टिंग करायला आलो आहे. या घटनेच्या दीड वर्षानंतर मला फोन आला की, असा एक सिनेमा आहे त्यात काम कराल का? त्यावेळीही मी बघू असं सांगितलं. मला वाटलं आपल्या पुढच्या पीढीला सांगता येईल की, आपल्याला चित्रपटाची ऑफर मिळाली होती. त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी डन असं सांगितलं. मग मीच त्यांना म्हणालो जरा थांबा, मला घरी याबाबत बोलावं लागेल. मला जाणिव होती की आपले वडील मुख्यमंत्री आहेत. आपण असंच निर्णय घेऊ शकत नाही. आईला सांगितल्यावर त्यांनी होकार दिला .

रितेशनं सांगितलं होतं की, मी हैदराबादला लूक टेस्टला गेलो होतो. मला सांगण्यात आलं की हिरोईन देखील त्याच विमानानं येणार आहे. आम्ही विमानातून उतरल्यानंतर प्रोडक्शनच्या एका व्यक्तिनं आमची ओळख करुन दिली. त्यावेळी मी जिनिलियाला HI केलं तर तिनं अॅटिट्यूड दाखवत Hello असं म्हटलं, असं रितेशनं सांगितलं. यावर जिनिलिया म्हणाली की, मी विचार केला की, मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. तो अॅटिट्यूड दाखवेल, त्याआधी मीच अॅटिट्यूड दाखवला. रितेशनं सांगितलं की, दोन दिवसानंतर आम्ही शूटिंगच्या ठिकाणी भेटलो .

रितेश आईला सांगितल होत सांगितल्यावर त्यांनी होकार दिला होता . मग मी बाबांना भेटायला गेलो. वर्षा बंगल्यावर त्यांना भेटलो आणि चित्रपट करणार असल्याचं सांगितलं. त्यावर ते म्हणाले तू अॅक्टिंग करणार आहेस का? मी हो असं सांगितलं. त्यानंतर मी त्यांना म्हटलं की, सिनेमा चालला नाही तर लोकं विलासरावांच्या मुलाचा सिनेमा चालला नाही असं म्हणत तुमच्यावर टीका होईल. माझी काही ओळख नाही, तुमची ओळख आहे. त्यावर ते (विलासराव देशमुख) की, तू तुझ्या नावाची काळजी घे मी माझ्या नावाची काळजी घेईल. तुम्हाला जे आयुष्यात करायचं आहे त्याची जबाबदारी आपणच घ्यायला हवी, असं रितेशनं सांगितलं. त्यानंतर ही फिल्म फायनल झाली, असं रितेशनं सांगितलं होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com