Shweta Keswani
Shweta KeswaniTeam Lokshahi

कांस्टिग काऊच उघड करत अभिनेत्री म्हणाली, निर्मात्यासोबत तुला एकांतात....

सिनेमासृष्टीतील एक कडू सत्य म्हणजे कांस्टिग काऊच
Published by :
Team Lokshahi
Published on

सिनेमासृष्टीतील एक कडू सत्य म्हणजे कांस्टिग काऊच (Constig couch) जे कोणीही नाकारु शकत नाही. आतापर्यत अनेक अभिनेत्रीने पुढे येऊन कांस्टिग काऊचबद्दल उघड केले आहे. पण आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता केसवानी (Shweta Keswani) हिने कांस्टिग काऊच बद्दल उघड केले आहे. तिने एका मुलाखातीत बॉलिवुडसह टेलिव्हिजन इंडस्ट्रीबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

Shweta Keswani
'धर्मवीर मु.पो. ठाणे': प्रसाद ओक साकारणार 'आनंद दिघे'

अभिनेत्री श्वेता केसवानी हिने कहानी 'घर घर की' आणि 'देश मे निकला होगा चांद' आणि 'अभिमान' यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. नुकतेच एका मुलाखातीत श्वेताला कांस्टिग काऊच बद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर ती उत्तर देत म्हणाली,

"मी बॉलिवूडमधील काही चित्रपटात काम केले आहे. पण काही चित्रपट मी अर्ध्यावर सोडले कारण त्या चित्रपटाच्या कास्टिंगदरम्यान सांगण्यात आले होते की, तुला आऊटडोअर शुटसाठी एकटील यावे लागेल. तेव्हा मी १८ वर्षाची होती. तेव्हा मी माझ्या आईसोबतच शूटींगसाठी जायचे. पण त्यावेळी मला सांगण्यात आले की तुला एकटीला प्रवास करावा लागेल. त्यासोबतच मला असेही सांगण्यात आले की तुला निर्मात्यासोबत तुला एकांतात वेळ घालवावा लागेल. ज्यावेळी अशा अटी घातल्या जायच्या त्यानंतर मी त्या चित्रपटाला नकार द्यायची. याला कांस्टिग काऊच म्हणतात हे मला माहिती होते. त्यावेळी मला हातवारे करुन इश्याऱ्यांनी समजवण्यात यायचे पण मी या सगळ्यासाठी कधीही तयार झाली नाही. म्हणूनच मी चित्रपटांनध्ये कमी झळकली".

Shweta Keswani
पाहा VIDEO: महामानवाची गौरवगाथा मालिकेतील संकेत कोर्लेकरशी दिलखुलास गप्पा

"अनेक चित्रपटांदरम्यान हे माझ्यासोबत घडले आणि त्यामुळेच मी छोट्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली. कारण त्यावेळी छोट्या पडद्यावर काहीही कास्टिंग काऊचसारखा प्रकार घडला नव्हता. पण मला अनेकांना सांगायचे आहे की जर तुम्हाला अशापद्धतीने चुकीचे काही सांगितले जात असेल तेव्हा थांबा आणि मग निर्णय घ्या की आपल्याला अशा ठिकाणी काम करायचे नाही".

'सध्या मी हॉलिवूडमध्ये संघर्ष करत आहे. पण मी फार आनंदी आहे. कारण मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळत आहे. त्यासोबत मला कामही करता येत आहे'.असे ती म्हणाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com