रामदेव बाबांचा बॉलिवूडवर निशाणा, म्हणाले 'सलमान ड्रग्स घेतो आणि आमिर...

रामदेव बाबांचा बॉलिवूडवर निशाणा, म्हणाले 'सलमान ड्रग्स घेतो आणि आमिर...

योगगुरू बाबा रामदेव यांनी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे. आर्यवीर महासंमेलनात सहभागी होण्यासाठी रामदेव शनिवारी मुरादाबादमध्ये दाखल झाले होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

योगगुरू बाबा रामदेव यांनी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे. आर्यवीर महासंमेलनात सहभागी होण्यासाठी रामदेव शनिवारी मुरादाबादमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमाला संबोधित केले. बॉलिवूडमधील ड्रग्जबाबत रामदेव बाबा म्हणाले की, सलमान खान ड्रग्ज घेतो. ते इथेच थांबले नाहीत आणि पुढे म्हणाले की, . बॉलीवूड गेल्या काही काळापासून ड्रग्जमुळे चर्चेत आहे. यावर आता रामदेव बाबा यांनीही कलाकारांवर निशाणा साधला आहे.

रामदेव बाबा म्हणाले की, “सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकार ड्रग्सचे सेवन करत आहेत. सध्या सर्व सिनेसृष्टी, बॉलिवूड हे ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहे. यापूर्वी सलमान खानचा मुलगा ड्रग्ज घेताना पकडला गेला होता, याची तुम्हाला कल्पना असेलच. या प्रकरणी त्याला तुरुंगातही जावे लागले होते, असे रामदेव बाबा म्हणाले.

मात्र यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्यांना सलमान खान नाही तर शाहरुखचा मुलगा तुरुंगात गेला होता,” तसेच “शाहरुखच्या मुलाला ड्रग्ज घेताना पकडले होते. सलमानही ड्रग्ज घेतो. मला आमिर खान ड्रग्ज घेतो की नाही याबद्दल माहिती नाही. पण सध्या संपूर्ण बॉलिवूडच ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहे. इतर बॉलिवूडमधील कलाकार याचे सेवन करतात का याबद्दल देवालाच ठाऊक. पण लोकांनी अशाप्रकारच्या अंमली पदार्थांपासून दूर राहायला हवे. त्याचे सेवन करु नये,” असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com