रामगोपाल वर्माने महेश बाबूला झापलं; जाणून घ्या काय घडलं..

रामगोपाल वर्माने महेश बाबूला झापलं; जाणून घ्या काय घडलं..

रामगोपाल वर्मा यांनी महेश बाबूवर दिलेली प्रतिक्रिया व्हायरल...
Published by :
Saurabh Gondhali
Published on

देशभरात सध्या बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा संघर्ष सुरु झाला (Bollywood Vs Tollywood) आहे. गेल्या काही दिवसांपासून टॉलीवूडच्या चित्रपटांनी बॉलीवूडला हादरवून टाकले आहे. बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य (Box office) चित्रपटांचा प्रभाव वाढताना दिसतो आहे. त्यामुळे त्याला प्रेक्षकांचा (Bollywood) प्रतिसादही मिळतो आहे. यापूर्वी बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. सलमान खान, आमिर खान, रणवीर सिंग यांनी टॉलीवूडच्या चित्रपटांवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या होता. अजय देवगण हा त्याच्या एका वेगळ्या मुद्द्यांसाठी चर्चेत आला होता.

रामगोपाल वर्माने महेश बाबूला झापलं; जाणून घ्या काय घडलं..
रणबीर आलियाच्या लग्नानंतर आता आणखी एक नवा खुलासा समोर...

दाक्षिणात्य चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबुनं दोन दिवसांपूर्वी केलेल्या एका प्रतिक्रियेनं तो चर्चेत आला आहे. त्यानं आपल्याला बॉलीवूड चित्रपट करण्याची काही गरज नाही. दुसरीकडे आपण बॉलीवूडला काही परडवणार नाही. असेही त्यानं म्हटलं होतं. त्यामुळे त्याच्या वक्तव्याचे मोठे पडसाद बॉलीवूडवर उमटले होते. आता यासगळ्यात बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी महेश बाबुवर आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

रामगोपाल वर्माने महेश बाबूला झापलं; जाणून घ्या काय घडलं..
बॉलिवूडची पहिली ‘लेडी सुपरस्टार’ श्रीदेवी आणि 30 रंजक गोष्टी!

राम गोपाल वर्मा यांनी एका मुलाखतीतून महेश बाबुवर तोफ डागली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, महेश बाबुनं बॉलीवूडला नावं ठेवली पण त्याला काही गोष्टींची जाणीव करुन त्याला हवी. ती म्हणजे त्यानं जो पैसा कमावला आहे तो त्याचे चित्रपट हिंदी भाषेत डब करुन. तेव्हा त्यानं जेव्हा बॉलीवूडवर कमेंट केली तेव्हा त्याच्या अनेक बाजुनं विचार केलेला नाही. एक अभिनेता म्हणून त्यानं काय बोलावं काय निर्णय घ्यावा हा त्याचा प्रश्न आहे. मात्र आपण काय बोलतो आहोत त्यामागील अर्थकारण, समाजकारण याचाही विचार व्हायला हवा.

मी महेशच्या प्रामाणिकपणाचे कौतूकच करतो. पण त्यानं ज्याप्रकारे बॉलीवूडवर टीका केली आहे ती आवडलेली नाही. त्याचा बॉलीवूडशी संबंध तरी काय आहे, आणि त्यानं असं का बोलावं, त्यामुळे मला तरी त्याची प्रतिक्रिया आवडलेली नाही. अशा शब्दांत राम गोपाल वर्मा यांनी महेशबाबुला बोल सुनावले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com