राज कुंद्रा यांच्या पोलीस कोठडीत २३ जुलै पर्यंत वाढ

राज कुंद्रा यांच्या पोलीस कोठडीत २३ जुलै पर्यंत वाढ

Published by :
Published on

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात राज कुंद्रा यांच्या पोलीस कोठडी २३ जुलै पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

याच प्रकरणात राज कुंद्र यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सात ते आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कुंद्राला अटक केली. अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.

राज कुंद्रा आणि रियान थार्पला किला कोर्टात केलं हजर केले होते. समोर आलेल्या माहितीनुसार राज कुंद्राला यांच्या पोलीस कोठडी २३ जुलै पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com