Raj Kundra Arrest : पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने पहिल्यांदाच शेअर केली Instagram पोस्ट

Raj Kundra Arrest : पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने पहिल्यांदाच शेअर केली Instagram पोस्ट

Published by :
Published on

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना सोमवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अटक केली. राज कुंद्रा यांच्या अटके नंतर बऱ्याच चर्चा झाल्या. राज यांच्या अटके नंतर शिल्पा पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवरुन व्यक्त झाल्याचं पहायला मिळत आहे.

सोमवारपासून शिल्पाने कामाबरोबरच सोशल मीडियावरुनही ब्रेक घेतला होता. मात्र गुरुवारी रात्री तिने एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये तिने एका पुस्तकाच्या पानाचा फोटो शेअर केलाय. यामध्ये जेम्स थर्बर या लेखाचं एक वाक्य दिसून येत आहे. "रागात मागे वळून पाहू नका किंवा घाबरुन येणाऱ्या काळाकडे पाहू नका उलट जागरुक राहून याकडे पाहा," असा या वाक्याचा अर्थ आहे.

ज्या लोकांनी आपल्याला दुखावलं आहे, ज्यांनी आपल्याला निराशेच्या गर्तेत ढकललं, ज्यांच्यामुळे आपल्याला दुर्देव असल्यासारखं वाटलं त्या लोकांच्या भूतकाळाकडे आपण रागाने वळून पाहतो. भविष्याकडे पाहतानाही आपण माझी नोकरी जाईल, मला एखादा आजार होईल किंवा जवळच्या एका व्यक्तीचे निधन होईल या भीतीमध्ये जगत असतो. आपण सध्याच्या वर्तमानामध्ये जगायला शिकलं पाहिजे. काय घडलं आणि काय घडणार याबद्दल विचार करण्याऐवजी आहे त्या वास्तवात जगलं पाहिजे, असा या पोस्टमधील लेखकाच्या ओळींचा अर्थ आहे.

मी जिवंत असल्याबद्दल स्वत:ला भाग्यवान समजतो आणि मोठा श्वास घेतो. मी भूतकाळामध्ये अनेक आव्हानांना तोंड दिलं आहे आणि भविष्यातही देईन. माझं आजचं आयुष्य जगण्यापासून मला कोणीही विचलित करु शकत नाही, असं या पोस्टच्या शेवटच्या ओळींमध्ये लिहिण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com