Raj Kapoor : 'या' कारणावरून राज यांचे अश्रू अनावर...
बॉलीवूडचा शोमॅन म्हटल्या जाणाऱ्या राज कपूर (Raj Kapoor) यांना जगाचा निरोप घेऊन आज ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. पृथ्वीराज कपूर (Pruthviraj Kapoor) आणि रामसरानी मेहरा (Ramsarani Mehara) यांच्या 6 मुलांपैकी राज कपूर हे सर्वात मोठे होते. राज यांचा चित्रपट सृष्टीत एक नामांकित चेहरा म्हणून ओळखला जायचा. त्याच्या मनामनात अभिनयाची छटा उमटलेली होती. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी राज कपूर प्रथमच 'इन्कलाब' या चित्रपटात दिसले होते. त्यांची पहिली मुख्य भूमिका 1947 च्या नील कमलमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळाली. वयाच्या २४ व्या वर्षी राज कपूर यांनी आरके या नावाने स्टुडिओ सुरू करून इंडस्ट्रीत एक आदर्श उभारला. राज हे त्या काळातील सर्वात तरुण दिग्दर्शक म्हणून देखील नामांकित होते.
राज कपूर यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 रोजी पेशावर येथे झाला जो भारत-पाकिस्तान फाळणीनंतर आता पाकिस्तानचा भाग आहे. ते पृथ्वीराज कपूर आणि रामसरानी मेहरा यांचे पहिले अपत्य होते ज्यांचे नाव जन्मताच सृष्टीनाथ कपूर असं ठेवण्यात आलं होतं. पृथ्वीराज अभिनयात आपलं करिअर बनण्यासाठी बॉम्बे (मुंबई) पोहोचला तेव्हा संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत होतं.
राज कपूर आपल्या वडिलांसोबत चित्रपटांच्या सेटवर जात असत. 'इन्कलाब' (Inquilaab) या चित्रपटाच्या कास्टिंग दरम्यान बालकलाकाराची भूमिका राज कपूर यांना देण्यात आली होती.
बालकलाकाराची पहिली भूमिका स्वीकारल्यानंतर राज कपूर आपल्या तरुण वयात सेटवर छोटी-मोठी नोकरी करू लागले. वडिलांच्या म्हणण्यावरून राज कपूर दिग्दर्शक केदार शर्मासाठी क्लॅप बॉय म्हणून काम करू लागले. राज हे सेटवर जास्तीत जास्त वेळ केसांची सजावट करण्यात घालवत असे. टाळी देताना तो सीनमध्ये दिसावे असा त्यांचा प्रयत्न असायचा. एके दिवशी विषकन्याच्या सेटवर राज यांनी इतक्या जवळून टाळ्या वाजवल्या की एका अभिनेत्याची दाढी ताळ्यात अडकली. त्यामुळे दिग्दर्शकाला राग आला आणि त्याने राज यांच्या कानाखाली मारली. राज हे काहीच न बोलता अगदी शांतपणे कामावर निघून गेले. दिग्दर्शक केदारला याचं इतकं वाईट वाटलं की त्यानी दुसऱ्याच दिवशी राज यांना फोन करून 'नील कमल' (Neel Kamal) या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी त्याला विचारणा केली.
केदार शर्माने राज यांना चित्रपटात मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी देताच राज यांना खूप आनंद झाला. आणि राज यांनी आनंदाश्रू गाळत ढसाढसा रडू लागले. केदार शर्माने त्याला विचारले की राज मी तुला काल कानाखाली मारली होती. मग आज का रडत आहेस? राज म्हणाले की मला पहिल्यांदाच चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत नायक म्हणून काम करण्याची संधी तुम्ही दिली यामुळे मी रडत आहे. 'नीलकमल' या चित्रपटात राजसोबत मधुबाला मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट प्रचंड गाजला आणि राज कपूरला एक अनोखी ओळख मिळाली. राज कपूर चार्ली चॅप्लिनसारखा वावरायचे. त्यांची शैली भारतात इतकी प्रसिद्ध झाली की त्यांना भारताचे चार्ली चॅप्लिन म्हटले जाऊ लागले.