प्रियांका चोप्राने बॉलीवूडला म्हटले फेक, म्हणाली...
Gotham

प्रियांका चोप्राने बॉलीवूडला म्हटले फेक, म्हणाली...

बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपली कामाची छाप पाडणाऱ्या प्रियांका चोप्राचा प्रवास सोपा नव्हता. करिअरच्या सुरुवातीच्या काळात प्रियांकाला खूप रिजेक्शन मिळाले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपली कामाची छाप पाडणाऱ्या प्रियांका चोप्राचा प्रवास सोपा नव्हता. करिअरच्या सुरुवातीच्या काळात प्रियांकाला खूप रिजेक्शन मिळाले. एवढेच नाही तर लोकांना तिच्यासोबत काम करायचे नव्हते. ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राला बॉलिवूडमधील तिच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बहुतेक दिग्दर्शक तिला नाकारायचे.

तिने दिलेल्या एका मुलाखतीत प्रियंका चोप्राने सांगितले की, एक काळ असा होता की ती खूप खचलेली होती. असे असूनही, ती मजबूत होती. प्रियांकाने सांगितले की, ती वेळ तिच्यासाठी सोपी नव्हती. तिने अनेक चुका केल्या. तिची दोन वर्षे खरोखरच वाईट होती, कारण तेव्हा तीने कोणावर विश्वास ठेवला नाही, कोणता चित्रपट योग्य आहे आणि कोणता नाही हे देखील माहित नव्हते. तिचा एकही चित्रपट चालत नव्हता. त्यानंतर प्रियंकाने अभ्यास पूर्ण करण्याचा विचार केला. पण त्यानंतर प्रियंकाला 'अंदाज' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट 2003 मधील रोमँटिक ड्रामा आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार, लारा दत्ता आणि प्रियांका मुख्य भूमिकेत होते.

मुलाखतीत प्रियांकाला विचारले होते की ती इंडस्ट्रीत कशी टिकली? यावर ती म्हणाली, “मी जवळजवळ तुटले होते आणि त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचले आहे असे मला वाटते. मी मोठी झाली आहे. दीड वर्ष मला फक्त नकार मिळाला, माझ्यासोबत काम करण्याची कोणाचीच इच्छा नव्हती." प्रियांकाने तिला इंडस्ट्रीत काय आवडत नाही याचा खुलासाही केला. प्रियांका म्हणाली की इंडस्ट्रीतील लोक खूप हुशार आहेत, पण बहुतेक लोक खोटे आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com