RussiaUkraineWar: युक्रेन हल्ल्याचा निषेध करीत प्रियांका चोप्राने केलं मदतीचं आवाहन

RussiaUkraineWar: युक्रेन हल्ल्याचा निषेध करीत प्रियांका चोप्राने केलं मदतीचं आवाहन

Published by :
Team Lokshahi
Published on

रशियाने (Russia) युक्रेनवर (Ukraine) केलेल्या हल्लामध्ये सर्वसामान्य भरडले जात आहेत. तर काहीचे प्राणही गमवले आणि काही आपले प्राण वाचवण्यासाठी पळत आहेत. युक्रेनमधील परिस्थिती खूप चिंताजनक असून त्यांना कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी संघर्षला सामोरे जावे लागतायंत. रशियानं युक्रेनवर केलेला हल्ल्या खूप आक्रमक होता. एकंदरीत तेथील वातावरण भीतीदायक झालं आहे. याचपार्श्वभूमीवर रशियाने युक्रेनच्या झालेल्या आक्रमक हल्ल्याचा निषेधार्त अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) मदतीचे आवाहन केले आहे. तिने 'Unicef' या संस्थेच्या माध्यमातून या युध्दजन्य परिस्थितीमध्ये सापडलेल्या लोकांना सहकार्य आणि मदत करण्याचे आवाहन केले.

प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) मदतीच्या आवाहनासाठी तिच्या सोशल मीडियाअंकाडटवर (social media) एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तिने मदतीच्या आवाहनाची पोस्ट केली. या व्हिडिओमधून आपण रशिया आणि युक्रेनमध्ये हल्लामुळे उध्वभावलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊ शकतो. कसे लोकं अंडरग्राऊंड सब वे आणि स्टेशन्समध्ये आपला जीव वाचवण्यासाठी लपून बसलेयत, हे या व्हिडीओच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com