प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला?

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला?

Published by :
Published on

बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या बाळाची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सरोगसीच्या मदतीने आई झाल्यानंतर प्रियांकावर अनेकांनी टीका केली. दरम्यान नुकतंच प्रियांका आणि निकने सरोगसीचा पर्याय का निवडला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नुकतंच याचं उत्तर समोर आले आहे.

प्रियांकाला सध्या फर्टिलिटीबाबत कोणतीही समस्या नाही. पण आता तिचे वय ३९ आहे आणि त्यामुळे बाळ होणे ही गोष्ट तिच्यासाठी फार सोपी गोष्ट नाही. तसेच त्यांच्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकामुळे ही गोष्ट अधिक कठीण झाली असती. त्यामुळे अशा परिस्थितीत या जोडप्याने सरोगसीचा मार्ग निवडला.

https://www.instagram.com/p/CZAJvizvjf4/?utm_source=ig_web_copy_link

निक आणि प्रियांका यांनी एका एजन्सीच्या मदतीने या महिलेची भेट घेतली. ही या महिलेची पाचवी सरोगसी आहे. हे दोघेही तिला भेटले आणि त्यांना ती आवडली. त्यानंतर त्यांनी याबाबतचा निर्णय घेतला. दरम्यान प्रियांका आणि निकच्या बाळाचा जन्म एप्रिलमध्ये होणार होता, मात्र प्री-मॅच्युअर डिलीव्हरी झाली आहे.

प्रियांका चोप्राशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचं बाळ २७ व्या आठवड्यात जन्माला आलं आहे. बाळ आणि सरोगेट आई कॅलिफोर्नियाच्या एका रुग्णालयात आहेत. नियोजनानुसार बाळाचा जन्म एप्रिल महिन्यात होणार होता. मात्र त्या आधीच त्याचा जन्म झाल्यानं बाळाला रुग्णालयातच ठेवण्यात आलं आहे. तसेच आणखी काही दिवस त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेण्यात येणार आहे. ते बाळ निरोगी झाल्यानंतरच या मुलाला ते तिच्या घरी आणणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com